सुरुवातीला पुण्याबद्दल ब्लॉग का लिहावा वाटला हे काही उमगले नाही. पण हे पुणे शहर आहेच मुळी असे ..लहानपणी ट्रिपला येउन शनिवारवाडा पाहण्यापलिकडे माझा आणि पुण्याचा काही संबध ही नव्हता ..
पण माझ्या शिक्षणाच्या निमित्ताने तो इतका घट्ट होइल असे वाटले नव्हते. म.न.पा.(अस्सल पुणेकर माणूस याला carporation असेही म्हणतो) ला सिटी बसेस (PMT) लागल्या की माणसांचे लोंढेच्यालोंढे धावायला लागतात. या गर्दीतला थेम्ब मी, या पुण्याच्या रसात आता समरस झालोय!
या अन'ओळखी' शहरात माझा प्रवेश ..
डिग्रीची परीक्षा संपली. आणि वेध लागले ते MCS पुण्यात करण्याचे. वेध म्हणजे, वारे सुटले म्हणा admission घेण्याचे. (अरे हो या सगळ्या सुरुवातीच्या गडबडीत तुम्हाला माझ्या ग्रुपबद्दल सांगायचे राहून गेले की.. मित्र कंपनीबाबत मी कायमच भाग्यवान ठरलोय. आयुष्यात तुम्हाला चांगली साथ सांगत मिळणे तेवढे important असते जेवढे लहान मुलाना संस्कार! आमचा 12 जणाचा मोठा असणारा ग्रुप अभ्यास आणि मस्ती या दोन्ही गोष्टी बाबत कधी मागे राहिला नाही. या ग्रुप बद्दल किती लिहिले तरी ते कमीच .....)
या अनोळखी शहरात मी पाहिले पाउल टाकले ते या सर्वांच्या सोबतीने ... 10 april 2008 ला आमचे पेपर संपले . आणि बरोबर 11 apr ला आम्ही पुण्याच्या ट्रिपचा श्री गणेशा केला. पहाटे 5 वाजता निघालो ते पुण्याबद्दल चे कुतुहल कुशीत घेउन! आपण येणार म्हणुन सगळ पुणे लवकर आवरून आपल्या स्वागतासाठी तयार आहे असा काही भास मला व्हायला लागला! वाडिया कॉलेजचा फॉर्म भरायचा असल्या कारणाने Pune स्टेशन च्या स्टॉप ला उतरून घेतल! असा आमच्या 12 जणाचा 'फौजफ़ाटा ' वाडिया कॉलेज मधे निघाला. फॉर्म भरण्याचे सोपस्कार यथावकाश पार पडले. आणि मग आम्ही एक पाठोपाठ एक फ़र्रगुसन, मोडर्न, गरवारे, स.प या कॉलेजचे फॉर्म भरले! इथपरेंत सर्व ठीक होते. मी पुण्यात admission बद्दल फरसा desperate नव्हतो माझ्या मित्रांइतका तरी! . पण सर्वानी सोबत रहायचे या हेतु खाली सर्वजण त्या Entrance नावाच्या भयंकर प्रकाराला सामोरे जात होते. पहिल्या एक-दोन टेस्ट झाल्यानंतर मला जाणवत गेले की 'अभी नहीं तो कभी नहीं '! मग मीही प्रयत्न सुरु केले . म्हणतात ना 'पत्त्याच्या डावा मधे सर्वच पत्ते आपल्या मनाप्रमाणे पडतात असे नाही '! शेवटी आम्हा तिघा- चौघाना admission मिळाले तेहि काही कुबद्यांचा आधार घेत , अलग -अलग कॉलेजला ! या सर्व प्रवासात दोन -तीन वेळेस मुक्काम झाला पण generally, माणसाला भेडसावणारा हा प्रश्न काही लोकांमुळे खुपच सहज सुटला! त्यांचे हृण कधी फेडणे शक्य नाही! या दरम्यान प्रसाद दादाच्या हातची भुर्जी -पाव असो की दुर्गा ची कोल्ड कॉफी असो .. या आठवणी न मिटनाऱ्या दगडावरच्या रेषेप्रमाने मनावर कोरल्या गेल्या.
माझा एकट्याचा प्रवास ..
आतापरेन्त घरी 'आई -वडिलांच्या छत्राखाली' आणि 'मित्र कंपनीच्या सावलीत ' असणारा मी या गर्दीच्या शहरात एकाकी झालो होतो. मला गरवारे कॉलेज ला admission मिळाली! आम्ही मित्रानी सोबत रहन्याचे ठरवले होते . पण सुरुवातीला काही दिवस रहाण्याची अड़चण असल्याने सगळे अलग अलग राहिलो! या दरम्यान मी माझ्या एका अप्पर(पुण्याचे उत्तर दिशेचे टोक) ला राहणाऱ्या भावाकड़े दोन दिवस राहिलो. पावसाळ्याचे दिवस होते! पुण्यात ऊन, पाउस आणि थंडी ह्या तीन ही गोष्टी भरपूर प्रमाणात असतात. भरपूर पाउस, नविन कॉलेज, आणि त्यात बसेस चे गर्दी या गडबडित माझी जी तारांबळ उडाली हे न सांगितलेलेच बरे! जुन्या काळच्या गुरुजींचा जसा वेश असायचा तसा काहीसा माझा अवतार होता ! पाठीला सैक, डोक्याला उपरणे, एका हातात छत्री, दुसरया हातात बैग. कॉलेज सुटले की फ्लैट पाहत फिरायचे. 4 -5 दिवस ही धडपड झाल्या नंतर आमची finally कर्वेनगर या पुण्याच्या पश्चीमेंच्या टोकाकड़े रहाण्याची सोय झाली . या सर्व प्रकारामधे मला बाहेरून शिकायला आलेल्या मुलांच्या राहन्याच्या प्रश्नाची जाणीव झाली. त्यातूनच मी माझ्या पहिल्या Semister ला accommodation.com हा project केला. त्यात student section खाली cot basis, rent, girl/boys hostel add करून हा problem कसा Solve होऊ शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला .
पुणे तिथे काय उणे ...
अस का म्हणतात, हे मला पुण्यात आल्यावर कळले. विद्येचे माहेरघर असलेल्या या शहरात शिक्षणाचा दर्जा श्रेष्ठ आहे. खुप नविन - नविन गोष्टी शिकायला मिळतात येथे! पुण्याच एक वैशिष्ट असा आहे की इथे कधी बोअर नाही होत् . कधी जोशी वडेवाला कधी BIG BAZZAR , कधी Pune Central तर कधी SJS Mall , कधी F .S , कधी गुडलक, तर कधी F.C रोड ही आमच्या भटकंतिची ठिकाणे होऊ लागली! आणि पुस्तकांसाठी ABC....! सिंहगडची पावसाळ्यातील ट्रिप अविस्मरनीय होती. मग अशी एक -एक आठवणीची शिदोरी गाठीला बांधली जाऊ लागली. जोडीला रूम वर आमच्या virtual (computerise) IPL matches रंगू लागल्या. मग हरणाऱ्याची cold coffee ची पार्टी! कधी परवडणारा morning show तर कधी मराठी चित्रपटासाठी प्रभात ची वारी! सारेच काही आलबेल होते . मग आली exam , रात्र -रात्र जागून केलेला अभ्यास , first class साठी ची तगमग . मला आतापरेन्त कॉलेजचा lecture शी तारतम्य जमलेल नाही, माझ्यासाठी माझे मित्रच माझे गुरु होते कायम! exam झाली चांगले marks ही मिळाले! आता घडी नीट बसु लागली! मग दुसरे वर्ष सुरु झाले या वर्षी एका सरांबद्दल कळाले ते 'गोखले सर'. हे एक अजीब रसायन आहे, UNIX या विषयाचा क्लास ते घेत. 'OUT OF THE BOX Thinking' म्हणजे काय हे त्यांच्याकडून समजले! त्यांच्या तालमित ही खुप गोष्टी शिकायला मिळाल्या! कॉलेजला म्हटलेले गाणे असो किंवा Department मधे दिलेले Seminar असो, Project Presentation असो हे सगळे खुप रोमांचक होते! दुसरया वर्षाचे एक Semister संपले आणि शेवटचे Semister म्हणजे IT(Industrial Training) सुरु झाले IBN Technology कंपनी मधे...
(क्रमश...)
Saturday, April 17, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
This is really a fascinating blog, it really helps make reading your blog a lot easier.
ReplyDelete