Sunday, March 28, 2010

Begin On...(सुरुवात)

 English Title खाली मराठी blog ही संकल्पना जरा अजीब वाटते ना??? पण नविनच येऊ घातलेल्या ऋतिक च्या 'KITES '  चित्रपटाच्या theme नुसार आपले विचार समोरच्यापरेंत  पोहचवसाठी  भाषेची मर्यादा नसते......
        सुरुवातीला काही ब्लॉगर संदर्भात ....... Blogger ही साईट August 23, 1999 ला Pyra Labs तर्फे लौंच झाली. पुढे ती May २००७ परेंत google च्या under आली.  आणि आज blogger.com ही साईट टॉप ५० domain मधील 16  no. वर आहे. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की ज्या माध्यमाची आपण मदत घेतो आहोत, त्या बद्दल कुतुहल हे तुमच्या माझ्या मनात नक्की असते.....
      माझा blogger .com वर प्रवेश....
                         माझे graduation अहमदनगर कॉलेजला झाले. आमच्या कड़े दरवर्षी Exhibhition  व्ह्यायचे. मी S.Y. ला असताना 'How to create your own  'website ' या title खाली ब्लॉगर चा concept मांडला होता. काही non - computer field मधील लोकां परेंत 'INTERNET' ही संकल्पना सोपी करण्यासाठी हा प्रयत्न होता...  त्यानंतर mailing , chatting   च्या धकाधकी मधे blogging कड़े दुर्लक्ष झाले. आता पुन्हा काही मित्रांपासून स्पूर्ति घेउन ब्लॉगर वर परतलोय.
                       कुणीतरी म्हटलय की  'माणूस हा समाजशील प्राणी आहे ..त्याला त्याचे विचार लोकांशी share करावे वाटतात.' कुणीतरी काय, मलाच असे म्हणायचे आहे. काय आहे, कुणीतरी असे म्हटल्याशिवाय काय म्हटले हे ऐकायला तुम्ही-आम्ही सरसावत नाही. या जगामधे काय म्हटले यापेक्षा कुणी  म्हटले याला जास्त महत्व आहे हे कलुन चुकलय  मला. असो, कोणतीही  गोष्ट  करण्यासाठी  काहीतरी उदेश असावा, मी blogging करताना काही विचार तुमच्या परेंत पोहचवन्याचा  एक प्रमाणिक प्रयत्न करणार आहे. 'कुंग-फु-पांडा' या मला आवडलेल्या चित्रपटामधे एक dialog आहे, "Past is history, Tommorow is Mystery and Today is Gift thts why it's called as Present". या dialog प्रमाणे माझ्या भुतकाळातील काही आठवणी, काही वर्तमानातल्या गोष्टीतुन तुमच्या माझ्या भविष्याच्या दृष्टीने काही विचार मांडन्याचा प्रयत्न करेन.
                आता परेंत दोन ओळी जरी लिहिल्या तरी वडीलांना दाखवल्याशिवाय न वाचणारा मी  आज त्याना न दाखवताच ब्लॉग पोस्ट करतोय... Actually खुपदा आवडत्या लेखकाचा मुद्दा निघाला की मला माझे वडिल आठवतात. पेशाने बँकेत असलेले माझे वडिल लेखनी हातात घेतली की लेखक होतात. त्यांच्या लिखानाबद्दल पुढे सांगेनच ....  त्यांचे काही 'अमूल्य' विचार तुमच्या परेंत पोहचवणे हा सुद्धा माझ्या blogging चा उदेश असणार आहे.
   तर मग करुया का सुरुवात........................

नवा जोश आहे, संगे जुन्या आठवणी,
या ब्लॉगर वर सुरुवात करुया..
करुया नव्या आकाशासाठीच मागणी.
झाले गेले  गंगेला मिळाले, शोक काय त्याचा?
उभा राहुया रांगेत, करू नव्या प्रश्नांची वाटणी....
नव्या उत्साहाने करू, नव्याध्येयाची आखणी......